PHOTOS : सांगलीत 'खेळ चाले', प्रत्येक वळणावर लिंबू-अंडी टाकली
|
1/ 9
सांगली, 31 जुलै : सांगली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भानामती सारखे अंधश्रद्धेचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. रस्त्याच्या प्रत्येक वळणावर दोन लिंबू एक अंडी तर काही ठिकाणी एक लिंबू दोन अंडी. असं ठेवण्यात आले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
2/ 9
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकाची निवडणूक संपन्न होत आहे. उद्या १ ऑगस्ट रोजी मतदान आणि ३ ऑगस्ट रोजी मतमोजणी आहे.
3/ 9
निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास काही शिल्लक राहिले असताना काही प्रभागांमध्ये भानामतीचे प्रकार उघडकीस आले आहेत. प्रभाग क्रमांक १९ मध्ये लिंबू आणि कच्ची अंडी प्रत्येक रस्त्याच्या वळणाला टाकण्यात आले आहेत. घडलेल्या सर्व प्रकारांमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
4/ 9
भानामतीच्या अघोरी कृत्यान शहरात खळबळ उडाली आहे तर उमेदवारांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. चार दिवसांपूर्वी असाच जादूटोण्याचा प्रकार घडला होता.
5/ 9
मिरजेच्या लक्ष्मी मार्केटच्या चौकात बाहुल्या लटकवण्यात आले होते. एकंदरीतच सांगली महापालिका निवडणुकीमध्ये अंधश्रद्धेने कळस घातल्याचा गाठल्याचा आपल्याला दिसून येईल.
6/ 9
पुरोगामी महाराष्ट्र मध्ये करणी, भानामती आणि काळा जादू असे प्रकार आजही घडताना दिसत आहेत. आपला प्रतिस्पर्धी उमेदवार पडावा किंवा त्याला कमी मते पडावीत आणि नागरिक मतदानास बाहेर पडू नये. यासाठी ही काळी जादू केल्याची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.
7/ 9
सांगलीच्या स्फूर्ती चौकात प्रत्येक वळणावर असे प्रकार घडले आहेत. तर कोकणातून ही काळी जादू करून आणल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
8/ 9
एकूण 15 ठिकाणी हा प्रकार पाहण्यास मिळतोय.
9/ 9
शहरातील स्फूर्ती चौक, दत्त नगर, गव्हरमेंट कॉलनी बस स्टॉप, हशनी आश्रम या परिसरात लिंब आणि अंड्यांचा सडा पडलाय.