...म्हणून सेजल शर्माने उचलले टोकाचे पाऊल, बॉलिवूडच्या ग्लॅमर्स दूनियेचा आणखी एक बळी!
स्टार प्लस टीव्ही चॅनेलमधील 'दिल तो हॅप्पी है' या मालिकेत तिने अभिनेत्री म्हणून अभिनय केला. ऑगस्ट 2019 पासून मालिका बंद झाली असल्यामुळे सेजल शर्मा कामाच्या शोधात होती.
स्टार प्लस वाहिनीवरील 'दिल तो हॅप्पी हे 'या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्मा हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
2/ 12
मुंबई उपनगरातील मिरा रोड पूर्व भागातील शिवार गार्डन परिसरात रॉयल नेस्ट या इमारतीमध्ये गेल्या काही काळापासून सेजल शर्मा आपल्या मैत्रिणीसह वास्तव्य करत होती.
3/ 12
स्टार प्लस टीव्ही चॅनेलमधील 'दिल तो हॅप्पी है' या मालिकेत तिने अभिनेत्री म्हणून अभिनय केला. ऑगस्ट 2019 पासून मालिका बंद झाली असल्यामुळे सेजल शर्मा कामाच्या शोधात होती.
4/ 12
परंतु, कोणतेही काम न मिळाल्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होती.
5/ 12
सेजल शर्माने दिल तो हॅप्पी है या मालिकेसह अभिनेते आमिर खान यांच्यासोबत काम केलं आहे.
6/ 12
भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत तीने जाहिरातींमध्ये काम केलं होतं. या जाहिरातीमध्ये रोहित शर्मा, कृणाल पांड्यासुद्धा होता.
7/ 12
दीड महिन्यापासून काम नसल्यामुळे सेजल नैराश्यग्रस्त झाली होती
8/ 12
या नैराश्यातून गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास तिने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली.
9/ 12
10/ 12
'आपण गेल्या दीड महिन्यापासून नैराश्यात असून आत्महत्या करत आहोत, त्याकरिता कोणालाही जबाबदार ठरवू नये' असं तिने सुसाईड नोटमध्ये नमूद केलं.
11/ 12
मिरा रोड पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून सेजलचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
12/ 12
कामाच्या निराशेने की अन्य काही कारणाने सेजलने आत्महत्या केली का? याचा शोध मीरा रोड पोलrस करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली.