लवकरात लवकर रिझल्ट देणारी स्वस्त कोरोना टेस्ट किट बनवा आणि 37 कोटी जिंका
स्पर्धेत सहभागी होऊन तुम्ही कोरोनाच्या लढ्यात तुमचं योगदानही देऊ शकाल.
|
1/ 8
कोरोनाव्हायरशी लढण्यासाठी सध्या जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. लशी, औषधं यांच्यावर संशोधन सुरू आहे. विविध उपकरणं बनवली जात आहेत. आता यामध्ये तुम्ही तुमचंही योगदान देऊ शकता.
2/ 8
सध्या विविध कंपन्यांनी कोरोना टेस्टसाठी किट तयार केल्या आहेत. तुम्हीदेखील अशी स्वस्त आणि लवकरात लवकर निदान करणारी कोरोना टेस्ट किट तयार केली तर तुम्हाला कोट्यवधी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.
3/ 8
एक्सप्राइज (XPrize) या संस्थेने ही ऑफर दिली आहे. या कंपनीने 'एक्सप्राइज रॅपिड कोविड टेस्टिंग' ही स्पर्धा आयोजित केली आहे. 28 जुलैला या स्पर्धेची घोषणा केली आहे.
4/ 8
लवकरात लवकर चांगला परिणाम देणारी आणि स्वस्त अशी कोविड-19 टेस्टिंग किट तयार व्हावी हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
5/ 8
कमीत कमी 15 मिनिटांत रिझल्ट देणारी आणि अगदी लहान मुलालाही वापरता येईल अशी सहजसोपी टेस्टिंग किट हवी असल्याचं XPrize ने सांगितलं.
6/ 8
ही स्पर्धा सहा महिन्यांसाठी असेल. पुढील वर्षाच्या सुरुवातीला विजेत्याचं नाव घोषित केलं जाणार आहे.
7/ 8
विजेत्यांना तब्बल 5 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 37.39 कोटी रुपये मिळणार आहेत. एकूण पाच विजेत्या गटाची निवड केली जाईल. प्रत्येक गटाला 1 दशलक्ष डॉलर म्हणजे 7.47 कोटी रुपये दिले जातील.
8/ 8
जिंकलेल्या गटाला दोन महिने दर आठवड्याला कमीत कमी 500 कोरोना टेस्ट कराव्या लागतील. त्यांना शक्य असल्यास आठवड्याला 1000 किंवा त्यापेक्षा जास्त चाचण्याही करू शकतात.