फ्री प्रेस जर्नलमधली नोकरी सोडून बाळासाहेबांनी 1960 मध्ये स्वत: चं मार्मिक हे राजकीय साप्ताहिक सुरु केलं. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्यांचे वडिल प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आघाडीचे नेते होते. त्यांच्या विचारांचा बाळासाहेबांवर खूप मोठा प्रभाव होता. 1949 मध्ये बाळासाहेबांनी काढलेल्या या कार्टूनमध्ये त्यांनी काश्मीरमधील युद्धबंदीवर टीका केली आहे.
मुंबईतील वाढणाऱ्या परप्रांतीयांच्या प्रभावावर टीका करण्यासाठी बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये हे व्यंगचित्र प्रकाशित केलं होतं. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांवरही आपल्या व्यंगचित्रांतून भाष्य केलं आहे. 2 9 नोव्हेंबर 1948 ला महागाईवर बाळासाहेबांनी काढलेलं हे कार्टून प्रसिद्ध झालं होतं.