

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला सामना ६ डिसेंबरला एडिलेड येथे सुरू होणार आहे. नुकताच भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफ एडिलेड येथे पोहोचला. त्यांचे प्रवासारदरम्यानचे Inside Photos सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


ईशांत शर्मासह अन्य भारतीय खेळाडूंनी ‘भारत आर्मी’सोबत काही फोटो काढले. याआधी भारतीय संघाने सिडनी येथील क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया XI विरुद्ध चार दिवसांच्या सराव सामना अनिर्णित राहीला.


टीम इंडियाकडून मुरली विजयने अफलातून फलंदाजी करत १३१ चेंडूत १२९ धावा केल्या. त्याला केएल राहुलने उत्तम साथ दिली. राहुलने ६२ धावा केल्या. दोघांच्या चांगल्या फलंदाजीमुळे पहिल्या कसोटी सामन्यात ही मुरली आणि राहुलच सलावी जोडी म्हणून उतरतील असा अंदाज वर्तवला जात जात आहे.


दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर पार्थिव पटेलचेही टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे. त्यामुळए पहिल्या सामन्यात त्याला संघात स्थान मिळते की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. केएल राहुलने सराव सामन्यात ६२ धावा करून त्याने शेवटच्याक्षणी स्वतःला टीममधून बाहेर पडण्यापासून वाचवले.


टीम इंडियाचा फॅन ग्रुप भारत आर्मीने खेळाडूंचे दणक्यात स्वागत केले. रविंद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमारने त्यांच्यासोबत फोटो काढले.


ईशांत शर्मानेही भारत आर्मीसोबत फोटो काढले. इंग्लंड दौरा ईशांतसाठी फार चांगला गेला होता. आता तब्बल ११ वर्षांनी तो पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला आहे. गेल्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात त्याने रिकी पॉटिंगला फार हैराण केले होते. यावेळीही त्याची गोलंदाजी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना हैराण करेल का हा प्रश्न आहे.