कोरोनामुक्त रुग्णांची चिंता कायम! कोरोनाला हरवलं आता दुसऱ्या आजाराचं संकट
कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना एक वर्षभर दुसऱ्या आजाराचा धोका आहे.
|
1/ 7
भारतात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे मात्र तितकंच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही दिलासादायक आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेट 64.23% झाला आहे. जवळपास 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त झालेत.
2/ 7
कोरोनाशी लढा दिल्यानंतर या रुग्णांना आता नव्या आजाराचा धोका आहे. कोरोनाव्हायरसपासून वाचलेल्या लोकांना एक वर्षापर्यंत सेप्सिस आजाराचा धोका आहे.
3/ 7
जेव्हा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रिय होते तेव्हा सेप्सिस होतो. यामध्ये रुग्णाचे काही अवयव काम करणं बंद करू शकतो परिणामी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
4/ 7
द सनच्या रिपोर्टनुसार कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येकी पाच पैकी एका व्यक्तीला एक वर्षापर्यंत सेप्सिस आजाराचा गंभीर धोका आहे, असं यूके सेप्सिस ट्रस्टने म्हटलं आहे.
5/ 7
यूके सेप्सिस ट्रस्टच्या मते, ब्रिटनमध्ये जवळपास एक लाख लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यापैकी 20 हजार लोकांना सेप्सिसचा धोका आहे.
6/ 7
सेप्सिस आजाराबाबत सरकारने जागरूकता करावी अशी मागणीदेखील यूके सेप्सिस ट्रस्टने केली आहे. नागरिकांनीदेखील याच्या लक्षणांबाबत माहिती करून लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन केलं आहे.
7/ 7
बोलताना त्रास होणं, स्नायू आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना, श्वास घ्यायला त्रास, लघवी न होणं, त्वचेचा रंग बदलणं अशी सेप्सिसची लक्षणं आहेत.