महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र आजपासून मॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 9 ते 7 वाजेपर्यंत मॉल सुरू राहणार आहेत. तब्बल 4 महिन्यांनंतर मॉल सुरू होणार असल्याने तुम्हीदेखील मॉलमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर काय खबरदारी घ्याययला हवी, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.
मॉलमध्ये आवश्यक ती खबरदारी घेतली गेली असेल तरी गर्दी झाल्या मॉल प्रशासनालादेखील सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळणं कठीण होईल. त्यामुळे मॉलमध्ये गर्दी होऊ न देणे ही आपली जबाबदारी आहे. विंडो शॉपिंगसाठी मॉलमध्ये जाऊ नये. अत्यावश्यक वस्तू खरेदी करायच्या असतील तरच जावं, असा सल्ला डॉ. सांघवी यांनी दिला आहे.
अनेक मॉलमध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. गेटजवळ तापमान तपासलं जातं. सोशल डिस्टन्सिंगसाठी नियम बनवण्यात आले आहेत. तरी स्वत:हून आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. चांगल्या दर्जाचा मास्क वापरा. स्टोरमधील प्रत्येक वस्तूला हात लावू नका. दरवाजाचं हँडल, एलिव्हेटर नियमित डिसइन्फेक्ट केले जात असतील तरी त्यांना स्पर्श करू नका. कारण सॅनिटायझेशननंतर त्यांना कित्येकांचा हात त्यांना लागला असेल याची माहिती आपल्याला नाही.
ट्रायल रूमदेखील बंदिस्त अशी जागा आहे. तिथ हवा खेळती नसते. अशा ठिकाणी जास्त वेळ राहू नये. अनेक मॉलमध्ये ट्राय केलेले कपडे स्टिम केले जात आहे. तर काही ठिकाणी 48 तासांसाठी ते वेगळे ठेवले जात आहेत. त्यामुळे हे कपडे सुरक्षित आहेत याची खबरदारी घ्या. कपड्यांची सॅनिटायझेशन प्रक्रिया कशी आहे याची माहिती करून घ्या.
प्रेग्ननंट महिला आणि वयस्कर व्यक्तींनी मॉलमध्ये जाणं टाळावं अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. डॉक्टरांनीदेखील हाच सल्ला दिला आहे. मॉलमध्ये जाणं खरंच गरजेचं असेल तर व्हिटॅमिन सीसह आवश्यक ते हेल्थ सप्लिमेंट्स घ्या जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. गरोदर महिलांनी आपलं नियमित लसीकरण करून घ्यावंस असा सल्ला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैशाली जोशी यांनी दिला आहे.
मॉलमध्ये गेल्यानंतर तुम्ही कॉफी प्याल किंवा काहीतरी खाल. अशावेळी काहीही खाताना हात नीट धुवा किंवा सॅनिटाइझ करून घ्या. योग्य पद्धतीने शिजवलेले पदार्थच खा. खाल्ल्यानंतरही हात सॅनिटाइझ करा. चहा-कॉफी पिण्यासाठी शक्यतो स्वत:चे कप न्या. तुम्ही डिस्पोजेबल कप वापरू शकता, असा सल्ला न्यूट्रिशिनिस्ट करिश्मा चावला यांनी दिला आहे.