प्रेग्नन्सीमध्ये कोरोनाची लागण झाल्यास बाळालाही कोरोना होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. असं प्रकरणही खूपच दुर्मिळ प्रमाणात दिसून आलं आहे. मात्र प्रेग्नन्सीत कोरोना झाल्यास त्या महिलेला मात्र इतर गंभीर समस्येचा धोका आहे.
2/ 7
प्रेग्नंट कोरोनाग्रस्त महिलेच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं. अमेरिकेच्या टफ्टस युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या केलेला अभ्यास एंडोक्रिनोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला.
3/ 7
गर्भावस्थेत महिलांमध्ये असलेले एस्ट्रोजेन हार्मोन रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढवतात. अशात त्या महिलेला कोरोनाची लागण झाल्यास हा धोका अधिकच वाढतो.
4/ 7
गर्भनिरोधक औषधं किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी घेत असलेल्या महिलांनाही असा धोका असल्याचं शास्त्रज्ञ म्हणाले.
5/ 7
रक्त दाटसर होणं आणि रक्ताच्या गुठळ्या होणं याचा कोरोनाव्हायरशी काय संबंध आहे हे समजून घेण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचंही शास्त्रज्ञ म्हणाले आहेत.
6/ 7
अशा परिस्थितीत महिलांना रक्त पातळ करणारी उपचार पद्धती घ्यावी लागू शकते किंवा एस्ट्रोजेनयुक्त औषधं बंद करावी लागू शकते, असं शास्त्रज्ञ म्हणालेत.
7/ 7
संशोधनाच्या अभ्यासिका डेनिअल स्प्राट म्हणाले, गर्भावस्थेत कोरोनाची लागण झालेल्या महिलांना रक्त पातळ करण्याचे उपचार देण्याची किंवा गर्भनिरोधक, हार्मोन थेरेपी घेणं बंद करण्याची गरज आहे की नाही हे तपासण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.