निवडणुक म्हटलं की मतं मिळवण्यासाठी वाट्टेल ती अमिषं दाखवली जातात. छत्तीसगढ मधल्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपला. इथल्या कोरबा इथं आचार संहिता भंगाचं 'आदर्श' उदाहरण पुढं आलंय. मतदानाला दोन दिवस राहिले असताना काही चिकन सेंटर्सवर 10 रूपयात एक किलो मटन दिलं जात असल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आढळून आलंय.
छत्तीसगडमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार रविवारी संपला. 20 नोव्हेंबरला इथं मतदान होणार आहे. उघडपणे प्रचार संपला मात्र मतांसाठी अमिषं दाखवण्याचे प्रकार आता जोरात असल्याचं बोललं जातंय. तर निवडणुक आयोगाची भरारी पथक लक्ष ठेवून असली तरी त्यांना चकवा देत काही टोळ्या मतांचं दान मागत फिरत असतात.