2020 मध्ये सेलिब्रिटींनी केलं नव्या पाहुण्याचं स्वागत; चाहत्यांना दिली GOOD NEWS
कोणकोणते सेलिब्रिटी या वर्षात आईबाबा झाले पाहुयात.
|
1/ 8
2020 मध्ये कोरोना काळात अनेक सेलिब्रिटींनी आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. या सेलिब्रिटींच्या कुटुंबात आणखी एका सदस्याचं आगमन झालं आणि आपल्या चाहत्यांसह त्यांनी आपला आनंद शेअर केला. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@theshilpashetty/@kalkikanmani)
2/ 8
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी छोटी परी शमिशा आली. 15 फेब्रुवारी 2020 ला शमिशाचा जन्म झाला. दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी दिली होती. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@theshilpashetty)
3/ 8
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानेही आपल्याला मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त केला होता. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@theshilpashetty)
4/ 8
अभिनेत्री लिजा हेडन आणि तिचा पती डिनो लालवानी फेब्रुवारी 2020 मध्ये दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. लिजाला दुसरा मुलगा झाला. लिजाने आपल्या सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करत आपल्या दोन्ही मुलांचा फोटो शेअर केला होता. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
5/ 8
अभिनेत्री कल्की कोचलिननेदेखील 7 फेब्रुवारी, 2020 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आपल्या इन्स्टाग्रामवर तिनं चाहत्यांसह आपला आनंद व्यक्त केला. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@kalkikanmani)
6/ 8
अभिनेत्री नताशा स्टेनकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पांड्यानेही महिनाभरापूर्वी आपल्या बाळाचं स्वागत केलं. 30 जुलैला त्यांच्या आयुष्यात आगस्त्य आला. पांड्याने आपल्या सोशल मीडियावर त्याचा फोटोही शेअर केला. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@natasastancovic_)
7/ 8
तर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांनीही गूड न्यूज दिली. तैमूरनंतर आता त्यांच्या घरीही लवकरच दुसऱ्या नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@kareenakapoorkhan)
8/ 8
आता अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनीदेखील आपल्या घरी 2021 मध्ये नवा पाहुणा येणार आहे, ही आनंदाची बातमी देऊन चाहत्यांना खूश केलं आहे.