वाढत्या वयानुसार महिलांना हाडांच्या समस्या अधिक बळावतात.
|
1/ 5
हाडं ठिसूळ होण्याची समस्या पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त जाणवते. हाडांबाबत महिलांच्या अनेक समस्या असतात. स्त्रियांमध्ये वाढत्या वयात हा आजार मोठ्याप्रमाणात दिसून येतो.
2/ 5
हाता-पायाची हाडं दुखणं, सतत कंबर दुखणं, सांधेदुख, पाठीच्या कण्यामध्ये बाक येणं, हाड फ्रॅक्चर होणं ही हाडं ठिसूळ झाल्याची लक्षणं आहेत.
3/ 5
तज्ज्ञांच्या मते, अनेक महिला वजन कमी करणाच्या नादात कमी खातात. त्यामुळे त्यांच्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता भासू लागते आणि हाडं कमकुवत होऊ लागतात.
4/ 5
मासिक पाळी बंद झाल्यानंतर शरीरातील हार्मोन्स कमी होतात आणि त्यामुळेदेखील शरीरातील कॅल्शिअम कमी होऊ लागतं.
5/ 5
कॉफीच्या अतिसेवनानेही हाडांवर परिणाम होतो, त्यामुळे कॉफीचं सेवन कमी करा. शरीराला कॅल्शियम मिळेल असा आहार घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘ड’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या आणि इंजेक्शनचा वापर करावा.