कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो (jair bolsonaro) यांनी अशाच एकाच समस्येबाबत माहिती दिली आहे.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना 7 जुलैला त्यांना कोरोनाचं निदान झालं होतं. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. गेल्या शनिवारीच त्यांचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे.
2/ 5
बोल्सोनारो काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र आता त्यांना एका नव्या समस्येचा सामना करावा लागतो आहे. 20 दिवस घरातच राहिल्यानंतर आपल्याला फुफ्फुसाची समस्या उद्भवल्याचं बोल्सोनारो यांनी सांगितलं.
3/ 5
आपल्याला उद्भवत असलेल्या समस्येनंतर आपण आपली रक्त चाचणी केली आणि त्यामध्ये आपल्या आपल्या फुफ्फुसात मोल्ड असल्याचं निदान झाल्याचं बोल्सोनारो म्हणाले.
4/ 5
आपल्याला झालेल्या या इन्फेक्शनबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली नाही. मात्र आपल्याला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे ते सांगितलं.
5/ 5
आपल्या खूप अशक्तपणा आणि थकवा जाणवत असल्याचं बोल्सोनारो म्हणाले. फुफ्फुसातील या इन्फेक्शनवर उपचारासाठी आपण अँटिबायोटिक्स घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं.