भारतात कोरोना लॉकडाऊन हळूहळू शिथील केला जातो आहे. अनलॉक 3.0 मध्ये जिम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिम बंद असतानाही सेलिब्रिटींनी घरच्या घरी फिट राहण्याचा प्रयत्न केला. सेलिब्रिटींनी फिट राहण्यासाठी सर्वात जास्त मदत घेतली ती सायकलची. अनेक सेलिब्रिटी लॉकडाऊनमध्ये सायकल चालवताना दिसले.