आता अशी दिसते 'बजरंगी भाईजान'ची मुन्नी; 5 वर्षात किती बदलला लूक पाहा PHOTO
'बजरंगी भाईजान' (bajrangi bhaijaan) फिल्मला 5 वर्षे पूर्ण झालीत. या पाच वर्षांत मुन्नीदेखील खूप बदलली आहे.
|
1/ 8
सलमान खानची 'बजरंगी भाईजान' फिल्म 17 जुलै, 2015 ला रिलीज झाली होती. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात, सलमान आणि करिनाव्यतिरिक्त नवा चेहरा दिसून आला. ती म्हणजे मुन्नी.
2/ 8
बजरंगी भाईजानच्या मागेमागे असणारी ही मुन्नी म्हणजे हर्षाली मल्होत्रा (Harshaali Malhotra). ती फक्त दिसायलाच गोड नाही तर तिचा अभिनयही तितकाच गोड होता. आपल्या अभिनयाने तिनं सर्वांच मन जिंकलं (Photo - harshaalimalhotra_03/Instagram)
3/ 8
बजरंगी भाईजानला आता पाच वर्ष पूर्ण झालीत. पाच वर्षांनंतर मुन्नीचा लूक बदलला आहे. ही गोंडस मुन्नी आता स्टायलिश झाली आहे. (Photo - harshaalimalhotra_03/Instagram)
4/ 8
'बजरंगी भाईजान'आधी हर्षाली 'कुबूल है', 'लौट आओ तृषा', 'सावधान इंडिया' यासारख्या टीव्ही सीरिअल्समध्येही दिसली. शिवाय एका जाहिरातीतही तिनं काम केलं आहे. (Photo - harshaalimalhotra_03/Instagram)
5/ 8
'बजरंगी भाईजान'नंतर हर्षालीने 2017 साली अर्जुन रामपालसहदेखील एका चित्रपटात काम केलं होतं, मात्र तो चित्रपट अद्यापही रिलीज झाला नाही. यानंतर हर्षालीने फिल्मपासून दूर झाली. (Photo - harshaalimalhotra_03/Instagram)
6/ 8
गेल्या पाच वर्षांत ती फिल्ममध्ये नसली तरी तिझी क्रेझ कमी झाली नाही. ती सोशल मीडियावर सक्रिय राहिली आणि तिच्या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दिली. (Photo - harshaalimalhotra_03/Instagram)
7/ 8
हर्षाली आता 12 वर्षांची झाली आहे. तिनं आता आपलं लक्ष पूर्णपणे अभ्यासावर केंद्रीत केलं आहे. (Photo - harshaalimalhotra_03/Instagram)
8/ 8
हर्षाली लवकरच पुन्हा फिल्ममध्ये दिसेल याची आशा चाहत्यांना आहे आणि तिला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. (Photo - harshaalimalhotra_03/Instagram)