संचेती रुग्णालयाच्या प्रोस्थेटीक आणि ऑर्थोटीक्स विभागाचे प्रमुख डॉ. सलील जैन यांनी सांगितलं, "वजनदार प्राण्यांच्या अवयवांची रचना करणं अवघड असतं. आम्ही आधी गायीच्या शरीररचनेचा अभ्यास केला आणि त्यानंतर कृत्रिम पायाची रचना तयार केली. कृत्रिम पाय तयार करण्यासाठी आम्ही त्या पायाचं माप दोन आठवड्यांपूर्वीच घेतलं"
संचेती इन्स्टिट्युट ऑफ ऑर्थोपेडीक आणि रिहॅबिलीटेशनचे प्रमुख डॉ. पराग संचेती म्हणाले, "कृत्रिम अवयव मानवी लोकांमध्ये सामान्य आहे. मात्र प्राण्यांमध्ये ही प्रक्रिया फार दुर्मिळ आहे. जास्त वजन असलल्या प्राण्यांसाठी प्रोस्थेटिक्स एक असामान्य गोष्ट आणि आव्हानात्मक कार्य आहे. प्राण्यांवर हे करण्यासाठी अनेक चाचण्या आणि त्रुटी पडताळून पाहणं आवश्यक आहे"
वजनदार प्राण्यांसाठीच्या कृत्रिम पायाची प्रक्रिया आव्हानात्मक असते. यामध्ये वजनाचा योग्य प्रमाणात समतोल राखण्याबाबत खबरदारी घेतली पाहिजे. या गायीचे बरेच हितचिंतक आहेत त्यामुळे तिची काळजी घेतली जाईल आणि तिला सर्वकाही करणं शक्य होईल, असंपेटा इंडियाचे सीईओ मणिलाल वल्लीयाते म्हणाले. तसंच जनावरांसाठी देशात असे आणखी काही उपक्रम आवश्यक असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं.