

सध्या बिग बाॅससंबंधी सगळीकडे एकच चर्चा आहे. अनुप जलोटा आणि त्याची 37 वर्षाची गर्लफ्रेंड जसलीन मथारू. दोघंही बिग बाॅसच्या घरात आलेत. ना उम्र की सीमा हो... म्हणत बाॅलिवूडमध्ये अशा अनेक जोड्यांनी लग्न केलीयत.


अभिनेता कबीर बेदीनं 69व्या वर्षी चौथं लग्न केलं. त्याची बायको परवीन दुसांज त्याच्यापेक्षा 29 वर्षांनी लहान आहे. कबीरच्या मुलीपेक्षाही ती चार वर्षांनी लहान आहे.


मान्यता दत्त आणि संजय दत्तनं 2008मध्ये लग्न केलं. त्याआधी दोघं एक वर्ष डेटिंग करत होते. मान्यता संजूबाबापेक्षा 19 वर्षांनी लहान आहे.


सैफ अली खान आणि करिनामध्येही 11 वर्षांचं अंतर आहे. सैफची आधीची बायको अमृता सिंग त्याच्याहून 12 वर्षांनी मोठी होती.


या वयातल्या अंतरांमध्ये राजेश खन्ना आणि डिंपलला विसरून कसं चालेल? राजेश खन्ना 31 वर्षांचा होता तेव्हा त्यानं 16 वर्षांच्या डिंपलबरोबर लग्न केलं.


हेमामालिनी आणि धर्मेंद्रची प्रेमकथा गाजलीच. धर्मेंद्रनं हेमामालिनीशी दुसरं लग्न केलं. तेव्हा त्यांच्यात 13 वर्षांचं अंतर होतं.