अंकिता लोखंडेने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आबे आणि विविध पोजमध्ये हसत-खेळत फोटो काढले आहेत. एका चाहत्याने कमेंट केली आहे की, ती एकदा सुशांतसोबत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती, त्यावेळी तिने अशाच प्रकारची साडी नेसली होती. ज्यामध्ये दोघेही खूप सुंदर दिसत होते. फोटो साभार- @lokhandeankita/Instagram
सुशांतच्या एका चाहत्याने अंकिताच्या पोस्टवर कमेंट केली आहे की, मला विश्वास आहे की तीदेखील एसएसआरला मिस करत असेल. ती त्याचं पहिलं प्रेम होती. कोणीच आपलं पहिलं प्रेम विसरू शकत नाही. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं आहे की, तू इतकी शांत आणि आनंदी कशी दिसू शकते. आम्ही एसएसआरचे चाहते त्याला खूप मिस करतो. फोटो साभार- @lokhandeankita/Instagram