'जलसा'वरील कंटेनमेंट झोन पोस्टर हटलं; आता अमिताभ यांची इच्छा पूर्ण होण्याची प्रतीक्षा
'जलसा'चं (jalsa) गेट बंद झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह अमिताभ बच्चन (amitabh bachchan) भावुक झाले होते.
|
1/ 6
कोरोना पॉझिटिव्ह अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमिताभ आणि अभिषेक यांच्यावर उपचार सुरू आहेत याला पंधरा दिवस झाले.
2/ 6
जेव्हा बच्चन कुटुंबातील सदस्यांना कोरोनाचं निदान झालं त्यावेळी त्यांच्या जलसा बंगल्याचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि मुंबई महापालिकेने बंगल्यावर पोस्टर लावलं होतं.
3/ 6
14 दिवसांच्या क्वारंटाइन पीरियड पूर्ण झाल्यानंतर आता बीएमसीने बंगल्याचा क्षेत्र कंटेनमेंट झोन मुक्त असल्याचं घोषित केलं आहे आणि त्याच्या गेटवर लावलेलं पोस्टरही हटवलं आहे. (PHOTO - ANI)
4/ 6
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार अमिताभ यांचं घर, ऑफिस आणि आजूबाजूचा परिसर संक्रमणमुक्त करण्यात आला आहे. 18 ते 20 जणांच्या टीमने जलसाच्या आत सॅनिटायझेशन केलं आहे. संपूर्ण घर सॅनिटाइश झालं असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. त्यावेळी एक वॉर्ड ऑफिसरही तिथं उपस्थित होता. (PHOTO - ANI)
5/ 6
दरम्यान जलसा बंगला आणि तिथं आपल्यासाठी एकवटलेले आपले चाहते यांच्या आठवणीत अमिताभ बच्चन भावुकही झाले होते. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्टही केली होती. (PHOTO - INSTAGRAM)
6/ 6
आज जलसाचं गेट बंद, सुनसान आहे. मात्र आशेवर जग कायम आहे. हा गेट पुन्हा प्रेमाने भरेल देवाची इच्छा असेल तर हा गेट चाहत्यांच्या प्रेमाने पुन्हा भरेल, अशी इच्छा अमिताभ यांनी व्यक्त केली आहे आणि आता याचीच प्रतीक्षा त्यांना आहे. (PHOTO - FACEBOOK)