Trump Fan Krishna: डोनाल्ड ट्रम्प यांची देवाप्रमाणे पूजा करायचा 'हा' भारतीय, हार्ट अटॅकने मृत्यू
डोनाल्ड ट्रम्प यांच्या जबरा फॅन बूसा कृष्णाचा हार्ट अटॅकने मृत्यू; नारळ, फूल वाहून रोज करायचा पूजा.
|
1/ 7
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या निवडणुकीच्या प्रचारांमध्ये व्यस्त आहेत. मात्र भारतात त्यांची देवासारखा पूजा करणारा तेलंगणामधील त्यांचा चाहता बूसा कृष्णा यांचे आज निधन झाले. कृष्णा यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. (फोटो: ट्विटर)
2/ 7
तेलंगणातील जनगामा जिल्ह्यातील कृष्णा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चाहते आहे. एवढेच नाही तर कृष्णा यांनी ट्रम्प यांचा एक पुतळा उभा केला आहे. त्याची ते पूजाही करत असत. या पुतळ्याची ते रोज न चुकता अभिषेकही करतात. (फोटो: ट्विटर)
3/ 7
कृष्णा याचे पूर्ण नाव बूसा कृष्णा असले तरी ट्रम्प यांचा खूप मोठा चाहता असल्यामुळे गावकरी त्यांना ट्रम्प कृष्णा म्हणत असत. (फोटो: ट्विटर)
4/ 7
कृष्णा यांनी आपल्या घराबाहेरील अंगणात ट्रम्प यांचा पुतळा उभा केला आहे. 15 कामगारांनी मिळून या पुतळ्याचे काम केले आहे. कृष्णा दररोज या पुतळ्याची नारळ अर्पण करून पूजा करतात. (फोटो: ट्विटर)
5/ 7
कृष्णा यांचे स्वप्न होते की त्यांना एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायचे होते. 24 फेब्रुवारी 2020 रोजी ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते, मात्र त्यावेळीही कृष्णा ट्रम्प यांना भेटू शकला नाही. (फोटो: ट्विटर)
6/ 7
कृष्णा यांनी आपल्या घराबाहेरच 5 फूट उंच असा ट्रम्प यांना पुतळा उभा केला आहे. हा पुतळा पाहण्यासाठी दूरवरून मंडळी या गावात येत असतात. (फोटो: ट्विटर)
7/ 7
कृष्णा यांचा आज हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण गावात दुखवटा पाळण्यात आला आहे. (फोटो: ट्विटर)