पोलीस अधिकारी लोकांची सेवा करण्यासाठी आणि गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठी असतात, मात्र काही पोलिसांच्या लाच घेण्याच्या सवयीमुळं संपूर्ण विभागची बदनामी होत असते.
2/ 6
असाच काहीसा प्रकार अहमदाबादमधील लेडी दबंग पोलीस उप-निरिक्षकानं केला. श्वेता जडेजा असे त्यांचे नाव असून, त्यांच्यावर 35 लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
3/ 6
श्वेता जडेजा यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. श्वेता या लेडी दबंग म्हणून ओळखल्या जातात.
4/ 6
पीएसआय श्वेता जडेजावर एका आरोपीवरचे गुन्हा मागे घेण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे.
5/ 6
श्वेता यांनी या आरोपीकडून 20 लाख रुपये घेतले होते, त्यानंतर 15 लाखांची मागणी केली होती.
6/ 6
दरम्यान, काही अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर श्वेता जडेजा यांची चौकशी करण्यात आली. यात त्यांनी लाच घेतल्याचे समोर आले.