रशियापाठोपाठ आणखी एक देश कोरोना लशीसाठी तयार; कधी येणार बाजारात वाचा
या कोरोना लशीचं (corona vaccine) तिसऱ्या टप्प्यातील ह्युमन ट्रायल सुरू आहे.
|
1/ 6
रशियाने जगातील पहिली कोरोना लस तयार करून लवकरच बाजारात उलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. आता रशियानंतर चीनदेखील आपली कोरोना लस डिसेंबरपर्यंत बाजारात येईल अशी आशा व्यक्त केली.
2/ 6
बीबीसीच्या रिपोर्टनुसार चीनच्या सिनोफार्म कंपनीने या वर्षाअखेरपर्यंत कोरोनाव्हायरसची लस तयार करणार असा दावा केला आहे.
3/ 6
सिनोफार्मचे चेअरमन लिऊ जिंगझेन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल यूएईमध्ये होत आहे आणि डिसेंबरपर्यंत ही लस बाजारात येण्याची आशा आहे.
4/ 6
लिऊ जिंगझेन यांनी ट्रायलवेळी आपणही डोस घेतल्याचं सांगितलं आहे. ग्लोबल टाइम्सशी बोलताना त्यांनी आपल्याला लशीचा कोणताही दुष्परिणाम झाला नसल्याचं सांगितलं.
5/ 6
चीनच्या बीजिंग आणि वुहान शहरातील वर्कशॉपमध्ये अनुक्रमे 10.2 कोटी आणि 10 कोटी लशीचं उत्पादन होऊ शकतं. या लशीच्या दोन डोसची किंमत 000 युआन म्हणजे जवळपास 10700 रुपये असेल.
6/ 6
जगभरात सध्या जवळपास 200 कोरोना लशींचं ट्रायल सुरू आहे आणि 20 पेक्षा अधिक लशी ह्युनम ट्रायलच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहेत.