

असं म्हटलं जातं, की प्रेमाचं काही वय नसतं. याचं उदाहरण घालून दिलं आहे अमेरिकेचा जोएल आणि त्याची बायको सराई यांनी. सराई ही जोएलहून 23 वर्षांनी लहान आहे. दोघांचं पहिल्या नजरेतच एकमेकांवर प्रेम जडलं.


बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर दोघांनी लग्न केल. मात्र सोशल मीडियावर लोक त्यांच्यावर खूप टीका करतात. जोएलला लोक म्हणतात की त्यांनी या मुलीला किडनॅप केलं आहे. आणि सराईवर ते पैशांसाठी लग्न केल्याचा आरोप करतात.


मार्च 2019 मध्ये रिअल इस्टेट एजंट असलेली 27 वर्षांची सराई अमेरिकेहून कोलोराडोला शिफ्ट झाली. तिला एक जोडीदार पाहिजे होता. डेटिंग अॅपवर तिला 50 वर्षांचा जोएल तिथं सापडला. जोएल एका मोठ्या कंपनीत सीइओ आहे.


सराई म्हणते, तिला जोएलमधील मॅच्युरिटी खूप आवडली. शिवाय त्याच्यातला सहानुभूतीचा भाव आणि काहीतरी नवं करण्याची जिद्द तिला भावली.


एका महिन्यातच दोघांना ही जाणीव झाली, की दोघं एकमेकांसाठी बनलेले आहेत. जोएलनं सराईला प्रपोज केलंं आणि दोघांनी फेब्रुवारी 2020 मध्ये लग्न केलं.


सराईचे आई-वडिल 53 वर्षांचे आहेत. त्यांना आधी हे थोडं अजब वाटलं, की त्यांचा जावई त्यांच्याच वयाचा आहे. मात्र सराईनं समजावल्यावर त्यांनी मान्य केलं.


सराई सांगते, की तिला एका मित्रानं म्हटलं, की तुला तर पैशांची गरज पडत नसेल कारण शुगर डॅडी तुला पैसे पुरवतात. शुगर डॅडी म्हणजे असा माणूस जो एका कमी वयाच्या मुलीला शारीरिक संबंधांच्या बदल्यात पैसे आणि इतर बाबी पुरवतो.


सराई आणि जॉन मात्र या गोष्टी अजिबात मनावर घेत नाहीत कारण त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आणि विश्वास आहे.