लक्षण विरहित कोरोना रुग्णच व्हायरसचा करतील नाश; संशोधकांचा दावा
40% रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत आणि हे रुग्ण कोरोना लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
|
1/ 7
जगभरात सध्या कोरोनाचे दोन कोटी रुग्ण आहेत. सात लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात आता लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढते आहे.
2/ 7
मात्र कोरोनाचे लक्षणं न दिसणारे रुग्ण ही चांगली बाब आहे, असं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील संसर्गजन्य आजाराच्या तज्ज्ञ मोनिका गांधी म्हणाल्यात.
3/ 7
मोनिका गांधी यांनी कोरोना रुग्णांचा अभ्यास केला. जर्नल ऑफ इंटनरल मेडिसीनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
4/ 7
40% रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत आणि कोव्हिड-19 चा नाश होण्यासाठी हे महत्त्वाचं ठरू शकतं, असा दावा मोनिका गांधी यांनी केला आहे.
5/ 7
मोनिका गांधी म्हणाल्या महासाथीच्या सुरुवातीला जेव्हा लोकांनी मास्कही घालणं सुरू केलं नव्हतं तेव्हा 15% रुग्णांमध्ये लक्षणं नव्हती. मात्र जेव्हा लोकांनी मास्क घालणं सुरू केलं तेव्हा लक्षणं न असलेल्या कोरोना रुग्णांचं प्रमाण 40 ते 45 टक्के झालं.
6/ 7
कोरोनाव्हायरसची लागण झालेले लक्षणविरहित रुग्णांचा अधिक दर ही वैयक्तिक आणि समाजासाठीदेखील चांगली गोष्ट असल्याचं मोनिका गांधी म्हणाल्या.
7/ 7
यामुळे कोरोनावरील लस आणि उपचाराबाबत नवी माहिती मिळण्यास मदत होईल किंवा हर्ड इम्युनिटीचा हा नवा मार्ग ठरेलं. ज्यामुळे लोकांना सौम्य कोरोनाची लागण होईल आणि कोरोनाचं संक्रमण रोखलं जाईल आणि महासाथ संपेल, अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.