[wzslider] मुंबईसह राज्यभरात पावसाने धो-धो धिंगाणा घातलाय. मुंबईतील अनेक भागात पावसाचं पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली. तर दुसरीकडे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला असून हार्बर लाईन, मध्य रेल्वे धीम्या गतीनं धावतं आहे. तर दुसरीकडे कोकणासह वर्धा,रत्नागिरी, रायगड, विदर्भात पावसाने थैमान घातलाय. नद्या-नाले तुडुंब भरलीय. तर अनेक धरणांची दारं उघडण्यात आली आहे. गेल्या आठवड्याभरापासून धिंगाणा घालणार्या या पावसाचा हा नजारा...