[wzslider] राज्याला गारांसह जोरदार पावसाने झोडपून काढले. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला पावसानं पुन्हा झोडपलंय. बीड जिल्ह्यातल्या माझलगावमध्ये गेवराईला गारा आणि पावसाचा तडाखा बसलाय. गारा आणि पावसामुळे गहू, हरभरा, कापूस, भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालंय. पावसाच्या तडाख्यात उरलीसुरली पिकंही हातची गेली आहेत. गेले सहा दिवस वर्धा जिल्ह्यात वादळी वार्यासह गारपीट यामुळे गहू , चणा, भाजीपाला यांच प्रचंड नुकसान झालंय. याशिवाय संत्रा , केळी अशा फळबागाही मोठ्या प्रमाणावर तडाखा बसलाय. एकट्या वर्धा जिल्ह्यात 35 हजार एकर शेतीचं नुकसान झालंय. दिडेशहून अधिक घरांची पडझड झालीय. आणि अनेक घरांचं नुकसान झालंय. आतापर्यंत या अस्मानी संकटामुळे 10 जणांचा बळी गेलाय तर हजारो जनावरांचा मृत्यू झालाय.