

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) पत्नी साक्षीचा (Sakshi Dhoni) 19 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. धोनी आपल्या परिवारासह सध्या दुबईमध्ये आहे. त्यामुळे साक्षीचा वाढदिवसही मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला. (csksuperfansofficial/Instagram)


साक्षीच्या बर्थ डे पार्टीमध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकही (Shoaib Malik)उपस्थित होता. (Sania Mirza/Instagram)


सानियानं फोटो शेअर करत साक्षीला विश केले. यावेळी पार्टीमध्ये सानियाची छोटी बहिण अनमही उपस्थित होती. (Sania Mirza/Instagram)


एवढेच नाही तर सुपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्माही यावेळी उपस्थित होती. अर्पितानं इंस्टास्टोरीमध्ये फोटो पोस्ट करत साक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (Arpita Khan Sharma/Instagram)


साक्षीच्या बर्थ डे पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. साक्षीनं 2010मध्ये धोनीशी लग्न केले होते. 2015मध्ये झिवाचा जन्म झाला. (csksuperfansofficial/Instagram)