

ऑनलाईन शॉपिंग फ्लिपकार्टवर (Flipkart) बिग बिलियन डेज (Big Billion Days) सेल 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सेलदरम्यान मोटोरोलाच्या फोनवर बंपर डिस्काऊंट देण्यात येणार आहे.


Motorola Razr: मोटोरोलाचा (Motorola) नवा फोल्डेबल स्मार्टफोन Razr 5G भारतात लॉन्च झाला आहे. या फोनची किंमत 1,24,999 रुपये आहे. परंतु सेलदरम्यान हा फोन 84,999 रुपये म्हणजेच 40000 रुपयांच्या बंपर सूटमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 6.2 इंची आणि बाहेरच्या बाजूला 2.7 इंची असे दोन डिस्प्ले आहेत.


Motorola edge+: या फोनवर 10 हजारांची सूट मिळतेय. मोटोरोला edge+ मध्ये 108MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनची किंमत 74999 रुपये आहे, सेलदरम्यान हा फोन 64,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर असून, 12 जीबी रॅम, 256 स्टोरेज आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.


Moto G9: मोटोरोलाचा हा स्मार्टफोन बजेट स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत 11,499 रुपये आहे. मात्र सेलमध्ये फोन 1500 रुपयांच्या सूटसह 9999 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. मोटो जी9 हा भारतातला पहिला स्नॅपड्रॅगन 662 चिपसेटवाला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम + 64GB स्टोरेज मिळतं.


Motorola One fusion+: हा फोन 1500 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करता येऊ शकतो. यात 64 मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची किंमत 17,499 रुपये आहे. मात्र या सेलमध्ये हा फोन 15,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर, 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज आणि 5000mAhची बॅटरी मिळते.