

आज आम्ही तुम्हाला अशा काही लोकांबद्दल सांगणार आहोत जे यूट्यूबमध्ये त्यांचे व्हिडिओ अपलोड करुन कोट्यवधी रुपये कमवतात. या यादीमध्ये ज्याचे नाव सर्वात वर आहे तो केवळ 8 वर्षांचा आहे. चला YouTube च्या सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटींविषयी जाणून घेऊया..


रेथ आणि लिंक (Rhett and Link) कमाल कॉमेडियन आहेत. आपल्या विनोदी व्हिडीओमधून लोकांना हसविण्यात ही जोडी Youtube वर सर्वाधिक पसंत केली जात आहे. या जोडीचं नाव सर्वाधिक पैसे कमवणाऱ्यांमध्ये घेतलं जातं. या दोघांची Youtube मुळे वर्षभराची कमाई साधारण 17.5 मिलियन (साधरण 129 कोटी रुपये) आहे.


रशियन-अमेरिकन Nastya केवळ 6 वर्षांची आहे. मात्र तिची Youtube मुळे वर्षभराची कमाई साधारण 18 मिलियन डॉलर (साधारण 132 कोटी) रुपये आहे. Nastya व्हिडीओ प्लेटफॉर्म Youtube मध्ये 6 चॅनल चालवते. आपलं शिक्षण आणि विनोदी व्हिडीओंमुळे ती खूप पॉप्यूलर आहे.


पाच मित्रांची टीम, डूड पर्फेक्ट (Dude Perfect) व्हिडीओ प्लेटफॉर्म Youtube मध्ये दुसरं सर्वाधिक कमाई करणारं चॅनल आहे. पाच मित्र आपल्या व्हिडीओमध्ये क्रेजी ट्रिक्स करतात. संपूर्ण जगात यांचे व्हिडीओ खूप प्रसिद्ध आहेत. 2019 मध्ये केवळ Youtube मधून या ग्रुपने 20 मिलियन डॉलर (साधारण 147 कोटी रुपये) इतकी कमाई केली आहे.


.रेयान काजी (Ryan Kaji) याचं वय केवळ 8 वर्षे आहे. मात्र त्याच्या वयामुळे त्याला लहान समजू नका. रेयान सद्यस्थितीत Youtube मध्ये सर्वात जास्त पैसे कमविणारा व्यक्ती आहे. टेक साइट pocket-lint च्या एका रिपोर्टनुसार रेयानने गेल्या वर्षी Youtube मधून 25 मिलियन डॉलर (साधारण 184 कोटी रुपये) कमावले. रेयान एक एज्युकेशनल प्लेटफॉर्मसाठी व्हिडीओ तयार करतो.