

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां विवाह बंधनात अडकली. नुसरतने बुधवारी तिने हिंदू पद्धतीने लग्न केलं. नुसरतच्या लग्नाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नातील काही फोटो स्वत: नुसरतने शेअर देखील केले आहेत.


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेली नुसरतने तुर्कस्तानमधील बोडरम येथे हिंदू पद्धतीने प्रियकर निखिल जैन हिच्याशी विवाह केला.


नुसरत आणि निखिल यांनी विवाह राजेशाही पद्धतीने करण्यासाठी तुर्कस्तान हा देश निवडला आहे. 19 जून ते 21 जूनपर्यंत डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे.


नुसरत आणि निखिल यांची भेट 2018मध्ये झाली होती. घट्ट मैत्री आणि त्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात असा त्यांच्या नात्याचा प्रवास झाला.


नुसरतने आपल्या लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेला लेहंगा घातला होता. तर निखीलने सब्यसानेच डिझाइन केलेली शेरवानी घातली होती.


प्रथम 17 जून रोजी प्री-वेडिंगची धमाल, मग 19 जूनला हिंदू पद्धतीने विवाह आणि संगीत असा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.