

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कॅप्टनकुल महेंद्रसिंग धोनीचा हा अप्रतिम फोटो रत्नागिरीचा पेन्सिल आर्टीस्ट नितिश जाधव यानं रेखाटला आहे. भारताने 2007 साली टी-20 विश्वकप जिंकला होता, त्यावेळीचा हा फोटो आहे. हा फोटो अजूनही क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करून आहे.


अलिकडच्या काही महिन्यात सर्व तरूणाईच्या वॉट्सअॅप स्टेसवर धुमाकुळ घालणाऱ्या आणि आपल्या एका गोड स्माईलने दर्शकांना भुरळ पाडणाऱ्या रश्मिका मंदन्नाला नितिशने आपल्या चित्राच्या कुपीत कैद केलंय. 'क्रश ऑफ इंडीया' असलेल्या रश्मिका हुबेहुब रेखाटणाऱ्या नितिशने चित्रकलेचं कोणतही शिक्षण घेतलेलं नाही. नितिशने केवळ एक छंद म्हणून पेन्सिल आर्ट जोपासला आहे.


अवेंजर्स, आयर्न मॅन यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटातून अगदी जगाच्या सर्व कानाकोपऱ्यातील दर्शाकांपर्यंत पोहचलेला रॉबर्ट डोवनी. हा अभिनेता केवळ हॉलीवूडसाठीच मर्यादीत राहिला नाही, तर भारतातही याचे अनेक चाहते आहेत.


कोणत्याही कला प्रदर्शनात हे चित्र मांडलं तर हमखास विजेता ठरवेल, एवढ्या ताकदीचं हे आजीबाईंचं चित्र. चेहऱ्यावरील सुरकुत्यांपासून नेसलेल्या साडीच्या पडलेल्या घड्या हे सर्व बारकावे नितिशने आपल्या चित्रात रेखाटले आहेत.


मराठी चित्रपटसृष्टीतले उत्कृष्ट अभिनेते श्रीरंग देशमुख यांचा हा रुबाबतला फोटो. त्यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे. 'पुढचं पाऊल' ही त्यांची विशेष गाजलेली मराठी मालिका आहे.


नितिशने अलिकडेच महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना त्यांचं स्केच काढून भेट दिलं आहे. त्यावेळी उदय सामंतांनी नितिशच्या पेन्सिल आर्टचे कौतुक केलं होतं.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा हा फोटो. नितिश लवकरच उद्धव ठाकरे यांना भेटून हे स्केच त्यांना भेट म्हणून देणार आहे.