भन्नाट आहे हे! मास्कमागे लपतोय चेहरा, मग आता चेहऱ्याचाच मास्क बनवा
हा प्रिंटेड मास्क (Printed mask) घातल्यानंतर तुमचा चेहरा (face) झाकला जाईल मात्र लपणार नाही.
|
1/ 7
कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी प्रत्येक जण मास्क वापरत आहे. त्यामुळे लोकांना ओळखणंही सध्या कठीण झालं आहे.
2/ 7
मास्कमागे आपला चेहरा लपला जात असल्याची खंत प्रत्येकालाच आहे. मात्र आता या मास्कमागे तुमचा चेहरा लपणार नाही. (फोटो - जी. श्रीजीथ, न्यूज 18 केरळ)
3/ 7
जो मास्क तुमचा चेहरा झाकतो आहे, त्याच मास्कला तुम्ही तुमचा चेहरा बनवला तर? (फोटो - जी. श्रीजीथ, न्यूज 18 केरळ)
4/ 7
मास्कवर आपला चेहरा प्रिंट करून हा मास्क चेहऱ्यावर लावल्यानंतर तुमचा चेहरा झाकला जाणार नाही. (फोटो - जी. श्रीजीथ, न्यूज 18 केरळ)
5/ 7
मास्क हा आता दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. लोकं वेगवेगळ्या प्रकारचे मास्क वापरत आहेत. काही विचित्र मास्कही आपण पाहिलेत. त्यात आता आपला चेहरा, आपली ओळखही राखली जाईल असे मास्क वापरण्याकडे लोकांचा कल दिसून येतो आहे.
6/ 7
असा मास्क तयार करण्यासाठी तुमचा फोटो काढावा लागेल आणि चेहऱ्याच्या जितक्या भागावर मास्क येतो, तितकाच भाग एडिट करून तोमास्कवर प्रिंट करता येईल. (फोटो - जी. श्रीजीथ, न्यूज 18 केरळ)
7/ 7
अशा पद्धतीनं तुमचा चेहरा मास्कवर प्रिंट केला जाईल. जो चेहऱ्यावर लावला तरी तुमचा चेहरा झाकला जाईल मात्र लपणार नाही. (फोटो - जी. श्रीजीथ, न्यूज 18 केरळ)