या यादीत पहिलं नाव आहे, 2015 साली आयएएस झालेल्या अन्सार अहम्मद शेखचं. अन्सारचे वडील रिक्षाचालक आहेत. अन्सार सांगतात, 'माझे वडील दिवसाला 100 ते 150 रुपये कमवायचे. अनेक वेळेला रात्रीचं जेवणही करता यायचं नाही. पण आता मात्र मी आयएएस अधिकारी होऊन माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.' अन्सार शेख हे पश्चिम बंगाल सरकारमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी या पदावर काम करत आहेत.
या यादीत दुसरं नाव आहे रोमन सैनीचं. रोमन यांनी वयाच्या 22 व्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. ते देशात 18 वे आले. यूपीएससीचं कोचिंग घ्यायचं असेल तर बराच खर्च होतो. त्यामुळे प्रत्येक जण हा खर्च करू शकत नाही. म्हणूनच ऑनलाइन ट्रेनिंगच्या माध्यमातून हुशार विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी ट्रेनिंग देण्याचा निर्णय रोमन सैनी यांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी 2015 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला.