चीनची Xiaomi कंपनी आणखी एक स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतवणार आहे. स्वस्त आणि मस्त असलेला हा स्मार्टफोन लाँच करण्याची तारीख कंपनीने जाहीर केली आहे.
2/ 7
ट्वीटच्या माध्यमातून जाहीर केलेल्या माहितीनुसार Xiaomi आपला हा नवा स्मार्टफोन 24 एप्रिल रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे. खास सेल्फी प्रेमींसाठी असलेला हा स्मार्टफोन हा Y सीरीज़चा राहणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे.
3/ 7
यावरून असा अंदाज नक्कीच लावता येईल की, Xiaomi ची येणारी सीरीज़ ही Redmi Y3 अशी राहील. कारण Xiaomi ने यापूर्वी Y सीरीजचे 2 स्मार्टफोन्स Redmi Y आणि Redmi Y2 बाजारात आणले आहेत.
4/ 7
Xiaomi चा 24 तारखेला लाँच होणारा नवा स्मार्टफोन हा नक्कीच Redmi Y आणि Redmi Y2 या दोन स्मार्टफोनपेक्षाही अपग्रेड असणार आहे.
5/ 7
या लेटेस्ट फोनचं खास वैशिष्ट्य असं की, यात 32 मेगापिक्सल चा Super सेल्फी कैमरा राहणार आहे. कंपनीने याचा एक टीजर जारी केला असून, त्यात या स्मार्टफोनला 'वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले' असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
6/ 7
असंही म्हटलं जात आहे की, Redmi नोट 7 प्रमाणेच Y3 मध्येसुद्धा ड्वेल कॅमेरा सेटअप असू शकतो. ज्यात 12+2 मेगापिक्सल असे दोन रियर कॅमेरे राहू शकतात.
7/ 7
या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत बोलायचं झालं तर, याची किंमत साधार 11 ते 12 हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते. आणि जर असं झालंच तर हा लेटेस्ट मोबाईल Redmi Note 7 Pro पेक्षाही स्वस्त राहू शकतो. Redmi Note 7 Pro चे दर 13,999 रुपयांपासून सुरू होतात.