बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. यामध्ये हायप्रोफाईल लीडर पुष्पम प्रिया पिछाडीवर आहे. ब्रिटनमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलेल्या प्रिया यांना आपल्या विजयाची पूर्ण खात्री होती. त्याचबरोबर वृत्तपत्रात भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जाहिरात दिली होती. त्याचबरोबर जगभरतील असे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे फॉरेन डिग्री म्हणून भारतीय कॉलेजमध्ये शिकल्याचं प्रमाणपत्र आहे.
आंग सांग सू की म्यानमारच्या विद्यमान राष्ट्रपती आंग सांग सू की यांचं भारताशी जवळचं नातं आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या सू की यांनी दिल्लीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केलं आहे. 1964 मध्ये त्यांनी लेडी श्रीराम या कॉलजमधून डिग्री घेतली होती. त्यानंतर 1987 मध्ये एक वर्ष त्यांनी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एडवांस्ड स्टडीजमध्ये फेलोशिपदेखील केली. त्यामुळे त्यांचा कल भारताकडे दिसतो.
हामिद करजाई अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करजाई यांनी हिमाचल प्रदेशमधील शिमल्यातील महाविद्यालयामधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले होतं. परराष्ट्र धोरण आणि राजकारण या दोन विषयांमधील ग्रॅज्युएशन त्यांनी पूर्ण केले होते. भारत आणि अफगाणिस्तान हे दोघे उत्तम मित्र असल्याचे अनेकदा त्यांनी म्हटलं होतं. परंतु सीएएबद्दल वाद झाल्यानंतर त्यांनी अनेकदा भारतविरोधी वक्तव्य केली आहेत.
बिंगू वा मुथारिका मलावीचे माजी राष्ट्रपती बिंगू वा मुथारिका यांनी देखील भारतातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. 1960 च्या दशकात त्यांनी दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. पाच वर्षांच्या काळात त्यांनी संपूर्ण भारत पाहिला होता. त्याचबरोबर ते स्वतःला दिल्लीवासीदेखील म्हणवून घेतात.
बाबूराम भट्टराई नेपाळचे माजी पंतप्रधान बाबूराम भट्टराई यांनी देखील भारतातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. 60 च्या दशकात चंडिगड कॉलेजमधून त्यांनी आर्किटेक्चरची पदवी घेतली होती. त्याचबरोबर जेएनयूमधून पीएचडी देखील केली. ते नेपाळमधील खूप लोकप्रिय नेते असून भारत आणि नेपाळच्या मजबूत संबंधांची ते नेहमी चर्चा करतात.
जिग्मे खेसर नामग्याल वांग्चुक भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांग्चुक यांनीदेखील भारताच्या दार्जिलिंगमधील सेंट जोसेफ शाळेतून आपलं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते ब्रिटन आणि अमेरिकेतदेखील गेले. त्या ठिकाणी त्यांनी राजकारणाचा अभ्यास केला. सर्वांत तरुण नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. सर्वांत कमी वयात सत्ता मिळवणारे ते त्यांच्या देशातील पहिले नेते आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यदेखील भारतात शिकून गेले आहेत.
हुसेन मोहम्मद इरशाद बांगलादेशचे माजी हुकूमशाह हुसेन मोहम्मद इरशाद यांनी देखील भारतात शिक्षण घेतले आहे. त्यांनी 70च्या दशकात दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. परंतु त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले की नाही याचा कोणताही पुरावा अस्तित्वात नाही. 1982 मध्ये सत्तापालट झाल्यानंतर ते राष्ट्रपती बनले होते. जवळपास 8 वर्ष ते या पदावर होते. त्यानंतर अनेक आरोप झाल्यानंतर त्यांना तुरुंगामध्ये टाकण्यात आलं होते.