

वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायामासोबतच पेय पदार्थांवरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही नियमीत पेय पदार्थ सेवन करीत असला, तर कॅलरिज अधिक घेतल्यामुळे तुमचं वजन कमी होण्याएवजी वाढण्याचीच शक्यता अधिक असते. अनेकदा असं होतं की, एनर्जी ड्रिंक म्हणून घेतलेलं पेय तुमच्यासाठी हानीकारक ठरू शकतं. कोणत्याही पेय पदार्थाचं सेवन करण्याएवजी हे ५ प्रकारचे प्येय (ज्युस) जर तुम्ही घेतल्यास तुमचं वजन तर कमी होणारच याशिवाय तुमच्या शरिराला आवश्यक तितकी उर्जा देखील मिळेल.


शहाळ्याचं पाणी –जर तुम्ही नियमीत शहाळ्याचं पाणी प्यायलात तर, तुमच्या शरिराला कधीच पाण्याची कमतरता भासणार नाही. तुमची त्वचा ताजीतवानी ठेवण्याकरीता आणि तुमचे केस काळेभोर ठेवण्याकरीता ते अत्यंत लाभदायक आहे. शहाळ्याचं पाणी तुमचं वजन कधीच वाढू देत नाही. कॅलरीज कमी असल्यामुळे तुमची चर्बि कमी करून ते तुमचं कोलेस्ट्रॉल सुद्धा ते नियंत्रित करतं.


लिंबू-पाणी - दररोज सकाळी उठल्यानंतर लिंबू-पाणी प्यायल्याने तुमची प्रकृती नेहमी उत्तम राहते. पण ते सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी घ्यायला हवं. यामुळे तुमचं वजन तर कमी होतच, शिवीय तुम्हाला सायनसचा कधीच त्रास होणार नाही. हिवाळ्यात तुम्ही ते कोंबट पाण्यात देखील घेऊ शक्ता.


ग्रीन टी – तुमच्या प्रकृतीसाठी खूप लाभदायक आहे. ग्रीन टी मुळे तुमची त्वचा, केसं तर उत्तम राहतेच, शिवाय तुमचं वजन करण्यासाठीदेखील लाभदायक आहे. ग्रीन टी मध्ये विशेष प्रकारचे पोलीफेनॉल्स असतात, जे तुमच्या शरीरात जमा झालेले फॅट्स कमी करण्यास मदद करतात.


फळांचा जूस – वाढणारे वजन कमी करण्यासाठी फळांचा जूस देखील लाभदायक असतो. मात्र, फळांच्या तुलनेत त्यात साखरेचे प्रमाण ज्यास्तं राहतं. म्हणून फळांचा ज्युस घेताना तो पाणी मिक्स करुन घेतल्यास त्यातील साखरेचं प्रमाण कमी होतं.


भाज्यांचा जूस – तुम्हाला स्वस्थ राखण्यासाठी आणि तुमचं वजन कमी करण्यीसाठी भाज्यांचा ज्युस देखील अत्यंत लाभदायक आहे. वजन कमी करण्यासाठी हे ऑप्शन तुमच्याकरीचा सर्वात स्वस्त आणि सोपं ठरु शक्तं. भाज्यांचा जूस प्यायल्यानंतर तुम्हाला बराचवेळ तुमचे पोट भरलेलं आहे असे जाणवत राहील. वेजिटबल जूस तयार करण्यासाठी तुम्ही गांजर, आवळ्याचा वापर करु शक्ता.