

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात झाला आहे. कार आणि ट्रकच्या धडकेमध्ये आई-वडिलांचा मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेली त्यांची 2 मुलं या अपघातातून बचावली आहेत.


थंडीच्या धुक्यामुळे रात्रीच्या वेळेस अपघात होण्याचं प्रमाण वाढलं आहे. खालापूर आणि पनवेल नजीक 3 वेगवेगळे अपघात झाले. त्या एका व्हॅगनॉर कारचा आणि ट्रकचा अपघात झाला.


ते म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी, तसाच काहीसा प्रकार या अपघातात घडला आहे. ट्रकने भीषण वेगात कारला धडक दिली आहे.


अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आई आणि वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतला असून लहान मुलांना पोलिसांनी सुरक्षित स्थळी हालवलं आहे.


या अपघातामध्ये लहान मुलांना किरकोळ जखम झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी चंद्रपूर जिल्ह्यात असाच एक अपघात घडला होता. त्यात अपघाता 11 लोकांचा मृत्यू झाला पण 12 1 वर्षाच्या चिमुकला यात बचावला होता. पाहुयात काय झालं होतं नेमकं...


टाटा मॅजिक आणि ट्रक यांच्यात गेल्या काही दिवसांआधी रात्रीच्या सुमारास झालेल्या धडकेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पण या अपघातात दीड वर्षांचं बाळ आश्चर्यकारकरीत्या वाचलं होतं.


ट्रक आणि टाटा मॅजकची जोरदार धडक झाल्याने 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. पण त्यावेळी आईच्या मांडीवर असलेलं बाळाला मात्र फक्त थोडीशी जखम झाली होती.


अपघातानंतर स्थानिकांनी मदतकार्य सुरू केलं तेव्हा त्यांना आईच्या मांडीवर हे बाळ दिसलं. त्यानंतर स्थानिकांनी या बाळाला बाहेर काढलं.


किशोर पाटील यांच्या घरी या बाळाला ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या पत्नी अलका पाटील या चिमुकल्याची काळजी घेत आहेत.


चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात यवतमाळकडे जाणाऱ्या टाटा मॅजिक वॅन आणि विरुध्द दिशेने येणा-या ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात महिलांसह अकरा जणांचा मृत्यू झाला होता.