विशेष म्हणजे, विराटची सर्वोत्तम खेळी ही ऑस्ट्रेलियाविरुद्धचीच आहे. त्याने ९० धावांची नाबाद खेळी याच संघाविरुद्ध खेळली होती. २६ जानेवारी २०१६ मध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात कोहलीने 55 चेंडूमध्ये 9 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर धावांचा डोंगर रचला होता. एवढचं नाही विराट त्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कारही त्याने पटकावला होता.
भारतामध्ये खेळलेल्या सामन्यांचा विचार केला तर इथेही ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड खूप खराब आहे. ऑस्ट्रेलियाने भारतात आजपर्यंत चार टी20 सामने खेळले गेले त्यातील तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. 10 ऑक्टोबर 2017 मध्ये गुवाहाटी येथे खेळलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 8 विकेट राखून जिंकले होते.