Happy Birthday Urmila Matondkar- या अफेअरमुळे उर्मिलाचं करिअर संपलं?
उर्मिलाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर दिग्दर्शक राम गोपाल वर्मासोबतच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती.
|
1/ 10
उर्मिला मातोंडकर तिच्या सिनेमांसाठी जेवढी ओळखली जाते तेवढीच तिच्या खासगी आयुष्यासाठीही नेहमी चर्चेत असते. बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरचा आज ४५ वा वाढदिवस.
2/ 10
उर्मिला आज भलेही सिनेसृष्टीपासून दूर असली तरी ९० दशक आणि सुरुवातीच्या २० च्या दशकात उर्मिलाच्या नावाचा दबदबा होता.
3/ 10
१९८३ मध्ये ‘मासूम’ सिनेमात बालकलाकार म्हणून उर्मिलाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तर मुख्य अभिनेत्री म्हणून तिने १९९२ मध्ये ‘चमत्कार’ सिनेमात पहिल्यांदा काम केलं.
4/ 10
उर्मिलाला अनेक सिनेमे मिळत तर होते, मात्र तिला सुपरहिट अभिनेत्री राम गोपाल वर्माच्या रंगीला सिनेमाने केलं.
5/ 10
१९९५ मध्ये आलेल्या रंगीला सिनेमासाठी उर्मिलाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
6/ 10
यानंतर उर्मिलाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. उर्मिलाने ‘सत्या’, ‘पिंजर’, ‘जुदाई’, ‘कौन’, ‘भूत’ अशा अनेक सिनेमांत काम केलं.
7/ 10
२०१४ मध्ये आलेल्या अजूबा सिनेमात तिने शेवटचं काम केलं. गेल्यावर्षी इरफान खानच्या ‘ब्लॅकमेल’ सिनेमातून तिनं कमबॅक केलं होतं. मात्र हे गाणं फारसं गाजलं नाही.
8/ 10
उर्मिलाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर दिग्दर्शक राम गोपाल वर्मासोबतच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती.
9/ 10
असं म्हटलं जातं की, राम वर्माचं बॉलिवूडमधील इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबत फारसं पटायचं नाही. यामुळे उर्मिलालाही इतर दिग्दर्शकांकडून फारशी कामं मिळायची नाहीत. याच कारणामुळे हळू हळू तिला काम मिळणं बंद झालं.
10/ 10
उर्मिलाने २०१६ मध्ये कश्मिरी व्यावसायिक मोहसिन अख्तर मीरशी लग्न केलं. तिचं लग्न हा बॉलिवूडमधील चर्चेचा विषय होता. मोहसिन उर्मिलापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. ती कार्यक्रमात अनेकदा पती मोहसिनसोबत दिसते.