

कोणीही शिक्षण सुरू करताना पुढे जाऊन नोकरी कुठली मिळेल, त्याचा विचार करतं. आजही असंख्य घरात स्त्रियांना संघर्ष करावा लागतोय. अनेकदा विचारपूर्वक क्षेत्र निवडलं तरीही पुढे नोकरी मिळणं कठीण जातं.


एका सर्वेनुसार पुरुषांच्या तुलनेत भारतीय महिला 5 टक्के जास्त बेरोजगार आहे. भारतात वेस्टर्न इंजीनियरिंग कंपनीसाठी काम करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी पक्षपाताचा अनुभव येतो.हा सर्वे कॅलिफोर्निया विश्वविद्यालयात केला होता.


या अभ्यासानुसार स्त्री आणि पुरुषाला वेगवेगळ्या पातळीवर पक्षपाताचा अनुभव येत असतो. भारतात महिला इंजिनियर्सना पुरुषांच्या तुलनेनं नोकऱ्या मिळत नाहीत.


44 टक्के पुरुष आणि 30 टक्के महिला इंजिनियर्सनी सांगितलं की त्यांना त्यांच्या राज्यामुळे पक्षपाताला सामोरं जावं लागलं होतं. 2017मध्ये हा सर्वे आॅनलाईन केला होता. 693 इंजिनियर्सनी त्यात भाग घेतला होता.


76 टक्के इंडिनियर्सनी सांगितलं की त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांसारखा सन्मान मिळवण्यासाठी सारखं स्वत:ला सिद्ध करावं लागतं.


45 टक्के महिला इंजिनियर्सनी कबूल केलं की त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर स्पर्धा करावी लागते. कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाचे प्राध्यापक जाॅन सी विल्यम्स म्हणाले, समाजात महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं स्थान मिळेल, यावर काम करावं लागेल.