

शिल्पा शेट्टीसोबत शनिवारी रात्री काही असं झालं की, ती स्वतः यातून सावरू शकली नाही. ‘सुपर डान्सर ३’ या रिअलिटी शोच्या सेटवर शिल्पा शेट्टी उपस्थित होती.


सेटवर शिल्पाचा नवरा राज कुंद्राही येणार होता. शिल्पा ‘सुपर डान्सर ३’ शोची प्रशिक्षक आहे. या शोच्या सेटवर ती कधी भावुक होते तर कधी आनंदाने नाचायला लागते. पण यावेळी असं काही झालं की ज्याचा शिल्पानेही कधी विचार केला नव्हता.सेटवर शिल्पाचा नवरा राज कुंद्राही येणार होता. शिल्पा ‘सुपर डान्सर ३’ शोची प्रशिक्षक आहे. या शोच्या सेटवर ती कधी भावुक होते तर कधी आनंदाने नाचायला लागते. पण यावेळी असं काही झालं की ज्याचा शिल्पानेही कधी विचार केला नव्हता.


तुम्ही फार गंभीर होऊ नका.. हा एक प्रँक होता. त्याचे झाले असे शनिवारी रात्री ‘सुपर डान्सर ३’ मध्ये फराह खान प्रशिक्षक म्हणून आली होती.


दरम्यान, शिल्पाला तिच्या नवऱ्याची कोणती गोष्ट आहे जी तिला अजिबात आवडत नाही. याचवेळी अनुराग बासु आणि गीता कपूरने तिच्यासोबत प्रँक खेळण्याचं ठरवलं.


एकीकडे शिल्पा उत्तर देण्यात व्यग्र होती तेव्हा अनुरागने शिल्पाच्या मोबाइलमधून तिच्या आईला मेसेज केला. या मेसेजमध्ये लिहिले की, मला राज कुंद्रापासून वेगळं व्हायचं आहे.


या मेसेज नंतर शिल्पाच्या आईचा लगेच फोन आला. यावेळी शिल्पाचे हावभाव पाहण्यासारखे होते. गोष्ट अजून बिघडायला नको म्हणून अनुराग आणि गीताने शिल्पाला सांगितलं की ते प्रँक करत होते.


हे ऐकताच शिल्पाला धक्का बसला आणि ती आपला फोन घ्यायला धावत गेली. यानंतर शिल्पाने घरी फोन करून आईला या प्रँक असल्याचं सांगितलं.