टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनाचे खूपच चाहते आहेत. ती आपल्या बिनधास्त अंदाजाने ओळखली जाते. सुरभीनं नुकताच आपला बोल्ड फोटोशूट केला आहे. तो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनाचे खूपच चाहते आहेत. ती आपल्या बिनधास्त अंदाजाने ओळखली जाते. सुरभीनं नुकताच आपला बोल्ड फोटोशूट केला आहे. तो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
2/ 8
छोट्या पडद्यावरील नागीण म्हणून सुरभी चंदनाला ओळखलं जातं. सुरभीनं नागीण 5 मध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर आपली एक वेगळीच छाप पाडली आहे.
3/ 8
सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंना 2 लाख चाहत्यांनी पसंत केलं आहे. सुरभी सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते. त्यामुळे सोशल मिडियावर तिला मोठ्या प्रमाणत लाईक आणि कमेंट मिळत असतात.
4/ 8
नुकताच सुरभी चंदनाचा 'बेपनाह प्यार' हा अल्बम प्रदर्शित झाला आहे. त्यालाही चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
5/ 8
नागीन 5 मध्ये सुरभी चंदना आणि शरद मल्होत्रा एकत्र झळकले होते. या दोघांच्या जोडीला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंत केलं गेलं होतं. त्यामुळे नागिन 5 संपल्यानंतर हे दोघे या अल्बममध्ये एकत्र झळकले आहेत.
6/ 8
सुरभी चंदना ही पहिल्यांदा 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या प्रसिद्ध विनोदी मालिकेत झळकली होती. मात्र त्यात तिनं खुपचं छोटसं पात्र साकारलं होतं.
7/ 8
त्याचबरोबर सुरभी कुबूल है' या मालिकेत सुद्धा सहाय्यक भूमिकेत झळकली होती. त्यात तिनं 'हया' या मुकबधीर मुलीचं पात्र साकारलं होतं.
8/ 8
मात्र सुरभीला खरी ओळख मिळाली ती, 'इश्कबाज' या मालिकेतून, या मालिकेद्वार ती घराघरात पोहचली. यातील तिचं अनिका' हे पात्र चाहत्यांना खुपचं भावलं होतं.