

भारतातील खेळण्यांच्या बाजारपेठेचं मूल्य सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे, पण दुर्दैवाने 80% खेळणी आयात केली जातात. म्हणूनच मोदी सरकारने भारतीय खेळांच्या बाजारपेठेला चालना देण्यासाठी टॉयकथॉन आयोजित केलं आहे.


भारताला, जागतिक खेळण्यांचं उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी टॉयकॅथॉन आयोजित केलं जात आहे.


लहान मुलांच्या खेळण्यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगभरात पोहचवण्याच्या उद्देशाने आणि देशी खेळण्यांना चालना देत हा उद्योग पुढे नेण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने ही नवी संकल्पना सुरू केली आहे.


हे एक खास प्रकारचे हॅकेथॉन आहे जिथे शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थी आणि शिक्षक, डिझाइन तज्ज्ञ, खेळणी तज्ज्ञ आणि स्टार्टअप्स, भारतीय संस्कृती आणि नीतीमूल्य, स्थानिक लोककथा आणि थोर व्यक्ती यावर आधारित खेळणी आणि खेळ विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना सामायिक करतील.