

काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या आगामी लोकसभा निवडणुका लढणार नाही आहे. यासंदर्भात त्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहलं आहे. त्यामुळे आता प्रिया यांच्या जागेवर कोणता उमेदवार उभा राहणार याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.


पिता सुनील दत्त यांच्या मृत्यूनंतर प्रिया दत्त यांनी साल 2005 ला पहिल्यांदा खासदार झाल्या होत्या. प्रिया दत्त यांनी 2009 ला लोकसभा निवडणुका जिंकल्या होत्या पण 2014मध्ये त्यांना भाजपच्या पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला होता.


काँग्रेसच्या आतील नाराजीमुळे प्रिया दत्त यांनी 2019च्या निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या याच जागेवर आता अभिनेत्री नगमा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. नगमा या दिल्लीतून काँग्रेसच्या नेत्या होत्या.


तेलंगना प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांचंदेखील नाव प्रिया यांच्या पदासाठी पुढे येत आहे.