हे Android Apps खाली करू शकतात तुमचं Bank Account, लगेच करा डिलीट; अन्यथा...
बँक अकाउंट असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाढत्या सायबर क्राईमच्या (Cyber Crime) प्रकरणांत आता असे काही अॅप्स समोर आले आहेत, ज्यामुळे युजर्सचं बँक अकाउंट खाली होऊ शकतं. एक चूक महागात पडू शकते. गुगल प्ले स्टोरवर अशा काही धोकादायक अँड्रॉईड अॅप्सची (Android Apps) माहिती मिळाली आहे, ज्यामुळे मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
सायबर सिक्योरिटी रिसर्चर ThreatLabz च्या रिपोर्टनुसार, एकूण 11 धोकादायक अॅप्सची माहिती मिळाली आहे. या अॅप्समुळे बँकिंग फ्रॉडचा (Banking fraud) धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत अनेकांनी हे अॅप्स डाउनलोड केले आहेत. तुम्हीही हे अॅप्स डाउनलोड केले असतील तर, लगेच डिलीट करणं गरजेचं आहे.
2/ 4
रिपोर्टनुसार, जोकर मालवेअर (Joker Malware) अँड्रॉईड डिव्हाईससाठी तयार करण्यात आला असून युजर्सची हेरगिरी करण्यासाठी, SMS आणि इतर माहिती चोरी करण्यासाठी तयार केला गेला आहे. जोकर मालवेअर मोबाईलमध्ये असल्यास बँक फ्रॉड केला जाण्याचा मोठा धोका आहे.
3/ 4
जोकर मालवेअर अँड्रॉईड अलर्ट सिस्टमद्वारे सर्व नोटिफिकेशनची परवानगी मागतो. ज्यावेळी जोकर मालवेअर असणारे अॅप स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल होतात, त्यावेळी याचा उपयोग आर्थिक फसवणूक करण्यासाठी केला जातो.
4/ 4
Print Scanner, Read Scanner, Translate Free, Comply QR Scanner, PDF Converter Scanner, Delux Keyboard, Private Message, Font Style Keyboard, Free Affluent Message, Saying Message हे 11 अॅप्स तुमच्या फोनमध्ये असतील, तर लगेच डिलीट करा.