

विवाहबाह्य संबंधातील अनेक प्रकरण तुम्ही पाहिली असतील. मात्र मेक्सिकोमधील हा प्रकार धक्कादायक आहे. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार मेक्सिकोमधील (Mexico) तिजुवानातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील अल्बर्टो नावाच्या एका व्यक्तीचं शेजारील महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. यासाठी या पठ्ठ्याने प्रेयसी पामेलाच्या घरापर्यंत जाण्यासाठी एक सिक्रेट बोगदा तयार केला होता.


रिपोर्टमध्ये दिल्यानुसार अल्बर्टो कंस्ट्रक्शन वर्कर आहे आणि त्याने स्वत: हा बोगदा तयार केला होता. जेव्हा महिलेचा पती कामावर निघून जात असे तेव्हा तिचा प्रियकर बोगद्याच्या माध्यमातून तिच्या घरी पोहोचत होता.


अल्बर्टो आणि पामेला यांच्यातील प्रेमप्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा एकदिवशी पामेलाचा पती जॉर्ज कामावरुन लवकर घरी आला आणि त्याच्या पत्नीला शेजारील पुरुषासोबत आपत्तीजनक अवस्थेत पाहिलं.


जॉर्ज येताच अल्बर्टो काउचच्या मागे जाऊन लपला आणि नंतर गायब झाला. यानंतर जेव्हा जॉर्जने लक्षपूर्वक पाहिलं तर काऊचच्या मागे एक बोगदा तयार केला होता, जो शेजारील घरापर्यंत जात होता. त्यानंतर बोगद्याचा फोटोही व्हायरल झाला आहे.