

फ्रान्समधल्या दसो परिवाराशी जोडलेली कंपनी राफेल लढाऊ विमानं बनवते. हा दसो परिवार नामांकित आणि श्रीमंत आहे पण त्यांच्याबद्दल अनेक वादही आहेत. त्यांच्यावर घुसखोरी आणि भ्रष्टाचाराचे खटले दाखल झालेत. त्यांना या खटल्यांमध्ये शिक्षाही झालीय. तरीही फ्रान्सच्या राजकारणात या परिवाराचा दबदबा आहे.


हे आहेत सर्गेई दसो. फ्रान्सच्या मातब्बर दसो कुटुंबाचे प्रमुख. यावर्षी सर्गेई दसो यांचं त्यांच्या कार्यालयातच निधन झालं. दसो कुटुंबीयांच्या वेबसाइटवर अध्यक्ष म्हणून त्यांचं नाव लिहिलं आहे. त्यांचं नाव फोर्ब मासिकाच्या श्रीमंत लोकांच्या यादीत अग्रेसर असतं. 2018 मध्ये फ्रान्समधली चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची नोंद झाली. राजकीय क्षेत्रात सक्रिय असल्यामुळे तर त्यांची ताकद अजूनच वाढली.


सर्गेई दसो यांनी त्यांचे वडील मर्सेल दसो यांच्या निधनांनतर 65 व्या वर्षी या ग्रुपची सूत्रं हाती घेतली. मर्सेल यांनी 1929 मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. विमानांचे प्रोपेलर बनवण्यापासून त्यांनी या कंपनीची सुरुवात केली. ते पॅरिसच्या कोरबिल अॅसोन्स या उपनगरामध्ये 1995 ते 2009 या काळात महापौरही होते. त्यांच्यावर पैसे देऊन मतं मिळवल्याचे आरोप झाले. त्यानंतर ते फ्रान्सचे सिनेटर बनले. त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदावारांना निवडणूक निधी पुरवला, असंही म्हटलं जातं.


सर्गेई यांच्यावर 2 मोठे गुन्हा दाखल झाले. या प्रकरणी त्यांना बेल्जियममध्ये दोन वर्षांची शिक्षा झाली. दसो - ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळ्यामध्ये त्यांना ही शिक्षा झाली. या हेलिकॉप्टरच्या व्यवहारात दसो आणि ऑगस्टा कंपनीने संगनमत करू लाचखोरी केली, असा त्यांच्यावर आरोप होता. शिक्षेसोबतच जामिनाची मोठी रक्कमही त्यांना भरावी लागली. यानंतर फ्रान्समध्ये करात घोटाळा केल्याचीही शिक्षा त्यांना झाली. त्यावेळीही त्यांनी जामिनाची मोठी रक्कम भरली. त्यांनी आपला काळा पैसा लक्झेमबर्ग, लिचेस्टाईन आणि व्हर्जिन आयलंडच्या बँकांमध्ये जमा केला होता.


सर्गेई यांना 3 मुलं आणि एक मुलगी आहे. सर्गेई यांचे त्यांच्या मुलांशी नेहमीच तणावाचे संबंध राहिले आहेत. त्यांचा दुसरा मुलगा ऑलिव्हरशी त्यांचे संबंध फारच बिघडलेले आहेत. ऑलिव्हर हे फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीमध्ये डेप्युटी आहेत. ते अनेक वर्षं राजकारणात आहेत. ऑलिव्हर सध्या दसो ग्रुपचे चेअरमन आहेत तर सर्गेई यांची आणखी दोन मुलं लॉरेंट अँड थिअरी ग्रपचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.सर्गेई हे अत्यंत कडक शिस्तीचे होते, असं म्हणतात.


सर्गेई दसो यांनी त्यांच्या वडिलांनंतर कंपनीची जबाबदारी घेतली. त्यानंतर त्यांनी कंपनीचं विभाजन केलं. हवाई वाहतुकीसोबतच सॉफ्टवेअर, दारू, रिअल इस्टेट आणि मीडियामध्येही त्यांनी कंपन्या काढल्या. दसो ग्रुपच्या एकूण सात कंपन्या आहेत. एव्हिएशन क्षेत्रात त्यांच्या 3 कंपन्या आहेत. त्यातली एक कंपनी फाल्कन लढाऊ विमानं बनवते तर एक कंपनी राफेल बनवते.


दसो कंपनी ही राफेल बनवणाऱ्या इकाई कंपनीचाच एक भाग आहे. भारतीय सैन्यात आधी आणलेली मिराज विमानंही याच कंपनीने बनवली होती. आता दसो यांच्या कंपनीने बनवलेली राफेल विमानं अनेक देशांच्या ताफ्यात आहेत.


हे मार्सेल दसो. ते दसो एव्हिएशनचे संस्थापक आहेत. इंजिनिअर असलेल्या मार्सेल यांनी 1929 मध्ये ही कंपनी सुरू केली. दुसऱ्या महायुद्धामध्ये या कंपनीला अडचणींचा सामना करावा लागला पण नंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मार्सेल हे अत्यंत कडक शिस्तीचे बॉस होते. त्यांनी कधी त्यांच्या दोन्ही मुलांचाही मुलाहिजा ठेवला नाही.