

उत्तर प्रदेशातील मेरठमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका कुटुंबाने म्हशीच्या तेराव्याचं आयोजन केलं आहे. या निमित्ताने संपूर्ण गावकऱ्यांना तेराव्याचं जेवायला बोलावण्यात आलं आहे. यावेळी विधीनुसार सर्व गावकऱ्यांनाही म्हशीला श्रद्धांजली वाहिली. हा तेराव्याच्या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.


मोहम्मद शाकिस्त गावात राहणारे सुभाष शेतकरी आहेत. त्यांनी गेल्या 32 वर्षांपासून एक म्हैस पाळली होती. या म्हशीने गेल्या अनेक दिवसांपासून दूध देणं बंद केलं होतं. सुभाषने लहानपणापासून या म्हशीला पाहिलं आहे. त्यामुळे तिचा म्हशीवर खूप जीव होता. त्यामुळे दूध देत नसली तरी त्याने तिला विकण्याचा कधी विचारही केला नाही. मात्र दुर्देवाने तो आपल्या लाडक्या म्हशीला वाचवू शकला नाही


. म्हशीच्या मृत्यूनंतर सुभाषच्या कुटुंबीयांनी ढोल, नगाडा वाजवित तिला शेवटचा निरोप दिला. सोबतच तिच्या तेराव्यासाठी टेंट, आचारी आणला आणि संपर्ण गावात तेराव्याचा प्रसाद वाटला.


याशिवाय म्हशीसाठी एका श्रद्धांजली सभेचं आयोजनही करण्यात आलं. ज्यामध्ये गावकऱ्यांनी फोटोवर फुलं वाहिली आणि तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. यावेळी सुभाषने सांगितलं की, तो म्हशीला आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानत होता. त्यामुळए म्हशीच्या मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीप्रमाणे तिच्यासाठीही प्रार्थना करण्यात आली.