Home » photogallery » news » SWAYAMVAR OF TV ACTORS REALITY SHOW RAKHI SAWANT RAHUL MAHAJAN SHEHNAAZ GILL RATAN RAJPUT MIKA SINGH MHRN
छोट्या पडद्यावर एकेकाळी होता स्वयंवरचा ट्रेंड, मिकाआधी कोणी रचले होते ग्रँड स्वयंवर?
एकेकाळी टीव्हीवर वेगवेगळ्या कलाकारांनी स्वतःच स्वयंवर रचण्याचा नवा ट्रेंड सुरु केला होता. एका मोठ्या काळानंतर छोट्या पडद्यावर मिका सिंग (Mika Singh) स्वतःचं जंगी स्वयंवर करणार आहे. याआधी कोणत्या कलाकारांनी स्वतःच स्वयंवर केलं तुम्हला माहित आहे का?
|
1/ 9
छोट्या पडद्यावर स्वयंवराचा ट्रेंड काही नवा नाही. याआधी अनेक कलाकारांनी आपले जोडीदार शोधण्यासाठी स्वयंवराचा घाट घेतला आहे.
2/ 9
राखी सावंतने स्वतःसाठी स्वयंवर रचलं होतं. ‘राखी का स्वयंवर’ असं या कार्यक्रमाचं नाव होतं. राखीने यातील एका कन्टेंस्टंटशी विवाहसुद्धा केला होता. पण ते लग्न फार काळ टिकलं नाही.
3/ 9
सध्या राखी आदिल नावाच्या व्यक्तीला डेट करत आहे. त्यांचे एकत्र असतानाचे अनेक विडिओ viral झाले आहेत.
4/ 9
राहुल महाजनने सुद्धा स्वतःचं स्वयंवर रचून डिम्पी गांगुलीसोबत विवाह केला होता. पण त्यांचं नातं चार वर्षातच संपुष्ठात आलं जेव्हा डिंपीने राहुलवर घरेलू हिंसाचाराचे आरोप केले.
5/ 9
राहुलने कझाकिस्तान मॉडेल नतालिया सोबत विवाह केला आहे. हा राहुलचा तिसरा विवाह असून या जोडीने स्मार्ट जोडी शो मध्ये सहभाग घेतला होता.
6/ 9
रतन राजपूतने सुद्धा 'रतन का रिश्ता' नावाच्या कार्यक्रमात स्वतःसाठी वर शोधायचा प्रयत्न केला होता. रतन राजपूत आणि अभिनव शर्मा यांनी एकमेकांशी साखरपुडा केला मात्र काही काळातच त्यांचं ब्रेकअप झालं.
7/ 9
बिगबॉस मधील दोन तगडे कन्टेंस्टन्ट शेहनाज गिल आणि पारस छाबडा यांनी सुद्धा एक स्वयंवरावर आधारित गमतीदार रिऍलिटी शो मध्ये भाग घेतला होता.
8/ 9
सध्या मिका सिंग स्वतःसाठी स्वयंवराच्या माध्यमातून पत्नी शोधणार आहे
9/ 9
मिका दी वोटी असं या कार्यक्रमाचं नाव असून बारा कन्टेंस्टन्ट वधूंमधून तो योग्य मुलीची निवड करणार आहे.