महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीची ग्रामदेवता जानाई देवीचा दरवर्षी सोहळा पार पडतो. महाशिवरात्रीला जानाई देवीच्या पदयात्रेची सुरुवात होते.
2/ 7
देवीच्या मंदिरातून मानकऱ्यांचा मान स्वीकारत सोहळा सातारा जिल्ह्यातील पाटणजवळच्या निवकने इथल्या देवीच्या मूळ ठाण्याकडे प्रस्थान ठेवतो.
3/ 7
आकर्षक रथात देवीच्या उत्सवमूर्ती ठेवून वाल्हे, लोणंद, साल्पे, माहुली, तारळे अशी दरमजल करत पायी पदयात्रा सोहळा निवकने धारेश्वरला पोहोचतो.
4/ 7
तिथे देवीची महापूजा, परडीपूजन आणि चौक भरून मोठी यात्रा पार पडते. जेजुरीकर मोठ्या संख्येने यात सहभागी होतात. त्यानंतर सोहळा माघारीचं प्रस्थान ठेवून होळीच्या दिवशी जेजुरीत पोहोचतो. होळी पेटवून सोहळ्याची सांगता होते
5/ 7
काल संध्याकाळी पालखी सोहळ्याचं जेजुरीत आगमन झाले. सोहळा रात्री उशीरा देवीच्या मंदिरात पोहोचला. होळी पेटवून महापूजा आणि अभिषेकानं 15 दिवसांच्या पालखी पदयात्रा सोहळ्याची सांगता झाली.
6/ 7
श्री क्षेत्र भीमशंकरला परंपरेनुसार पंचक्रोशीतल्या राजपूर, निगडाळे, भीमाशंकरच्या नागरिकांनी कोकण कड्यावरही होळी पेटवण्यात आली. या होळीचं वैशिष्टय म्हणजे होळीत लाकूड-फाटा न जाळता फक्त पालापाचोळा आणि शेणाच्या गोव-या पेटवून इकोफ्रेंडली होळी साजरी झाली.
7/ 7
भीमाशंकरच्या कोकण कड्यावरील होळी पेटल्यानंतरच परंपरेनुसार तळकोकणातील गावांमधील होळया पेटवल्या जातात. पंचक्रोशीतले नागरिक शिधा आणून होळीला नैवेद्य दाखवतात आणि आलेल्या पाहुण्यांना जेवणाचा प्रसाद दिला जातो. राज्यातल्या अशा प्रथांमुळे होळीचं सौंदर्य अधिक उठून दिसतं.