भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सध्या लंडनमध्ये आहे. त्याने लंडनमध्ये घर घेतल्याचं म्हटलं जात आहे. लंडनमधील काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका इमारतीच्या गॅलरीमध्ये गांगुली डोक्यात हेल्मेट घालून उभा आहे. गांगुलीच्या लंडनमधील घराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्याची पाहणी करत असलेले फोटो व्हायरल झाले आहेत. सौरव गांगुली लंडनमध्ये गाडी चालवत असलेले फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रेल्वे स्टेशनवरील एक फोटो गांगुलीने शेअर केला आहे. 25 वर्षानंतरही या ठिकाणी फ्रेश वाटत असल्याचं त्याने म्हटलं होतं. गांगुली 27 फेब्रुवारीला न्यूझींलंडला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी तो उपस्थित असणार आहे.